Monday 20 October 2014


वेंडी डोनिंजर या, लेखिकेचं पेंग्विन प्रकाशनाचं, 'The Hindus: An Alternative History ' भारतात आलं खरं, पण तेसुद्धा हिंदुत्ववादी संघटनांच्या तावडीत सापडलं आणि त्यांनी त्यावर कायद्याने बंदी आणुन टाकली. हे पुस्तक म्हणजे खरोखरी घडलेला इतिहास आणि दंतकथा याचे विलगीकरण करण्याचा एक प्रयत्न आहे. पुस्तकात इतिहासाबद्दल ब्राम्हणवादाव्यतिरिक्त असलेले द्रुष्टीकोन, स्त्रियांचं योगदान, अस्प्रुश्यांचा इतिहास आणि भारतातल्या जैन, बौद्ध, मुस्लिम आणि ख्रिश्चन या धर्मांवर झालेला हिंदु धर्माचा परिणाम तसेच हिंदू धर्मावर त्यांनी केलेला परिणाम या सगळ्याचा परामर्ष घेण्याचा प्रयत्न आहे. यातला इतिहास व्यक्तिकेंद्रिततेपेक्षा समाजकेंद्रित आहे. थोडक्यात ह्या पुस्तकातला इतिहास हा लोकप्रिय मतप्रवाहातील नसून, तो एक प्रकारची काउन्टर कल्चर हिस्टरी या अनुषंगाने लिहिला गेला आहे. अर्थातच हिंदुत्ववाद्यांचा आताच्या दुकानातला तथाकथित इतिहास हा मिठाईचं कव्हर असलेला रिकामा खोका असल्याने त्यांनी या पुस्तकावर लागलीच बंदी घालण्याची मागणी केली आणि पेंग्विनने ती मान्यही केली. आता अंतर्वस्त्र घालायला विसरलेल्या इसमाला जशी आपली नाडी सुटायची भिती सर्वात जास्त सतावते ना, तसंच काहितरी!! (पुस्तकाचे रिव्युज वाचून जितकं जाणता आलं तितकं  )

0 comments:

Post a Comment

 

Neo-paradoxes Design by Insight © 2009