Monday 20 October 2014

जाणकार, हुशार आणि विवेकी भारतीय जनतेने निवडून दिलेले कही गट :
१) किरण खेर, मूनमून सेन, परेश रावल, हेमा मालिनी आणि मनोज तिवारी सारखी कामसू आणि सक्रिय माणसं निवडून आलीत!!!
२)महाराष्ट्रात बाळासाहेबांचे स्मारक, समुद्रातला शिवाजीचा पुतळा आणि विक्रांत नावाची युद्धनौका या विकासाच्या विषयांना अग्रस्थानी स्थान देणारया शिवसेनेच्या १९ उमेदवारांना भरघोस यश मिळालं आणि शिवसेना पुन्हा पुनरुज्जिवित झाली. महापालिकेत राहुन मुंबईचे कोणतेही साधे साधे प्रश्नही शिवसेनेने इतक्या वर्षात सोडवले नाहीत. साधी नालेसफाईसुद्धा केली नाही. केला तो फक्त भ्रष्टाचार!! (पण त्यांचा आतापर्यंतचा सर्वोच्च मतांचा रेकॉर्ड)
३) काँग्रेस सोडून बीजेपीत आलेल्या जवळ जवळ ५६ आयारामांचं (हा आकडा खूप आधी ऐकला होता. ह्या आयारामांची संख्या नंतर भरपूर वाढली आहे. ७०-८० आहेत. नक्की माहिती अजून नाही.) काय झालं? ते प़़क्षात येताक्षणीच जुन्या कार्यकर्त्यांना डावलून त्यांना भरघोस तिकिट वाटप झाल्याची बातमी होती म्हणे. मोदीलाटेवर स्वार येऊन निवडून आले का सगळे?? आता यातली बरीच मंडळी गेल्या दहा वर्षातल्या भ्रष्ट कॉंग्रेस सराकारशी संलग्न होती, म्हणजे काँग्रेसच्या भ्रष्ट उपद्व्यात आणि जनतेच्या खिशावर मारलेल्या डल्ल्यावर ह्यां च्रोरांची प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे वाटा होताच की!! कॉंग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पहाणार्‍या जाणकार जनतेने यांना हुशारीने सगळीकडे का पाडलं नाही? मोदीलाटेत हे सगळे अचानक एका रात्रीत पवित्र कसे झाले?
४)सध्याच्या निवडून आलेल्या सगळ्या खासदारांत प्रत्येक तीन पैकी एक गुन्हेगार व्यक्ती आहे. भाजपच्या २८२ पैकी अकुण ९८ जणांवर गुन्हेगारीचे आरोप आहेत!!! जनतेने जुन्या गुन्हेगारांना नाकारुन नवीन गुन्हेगारांची भरती केली आहे. काट्याने काटा निघतो असा काहीसा लोकांचा अभिनिवेष असावा!!!
५)मोदींवर भ्रष्टाचाराचा डाग नाही हे बोलणार्‍यांच्या डोळ्यांना सध्याच्या निवडणुकीत झालेला अमाप खर्च आणि उधळण बिलकुलच दिसली नाही, असे आहे का? ती उधळण प्रत्येकाला दिसली, पण जनेतेने त्या गोष्टीकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले. जनता हे झोपेचे सोंग अजून किती वठवणार आहे? भ्रष्टाचार नको म्हणून एक पक्ष नाकारताना त्याच गोष्टीचा आधार घेणारा दुसरा पक्ष हुशार जनतेने कसा स्विकारला? प्रत्येक पेपरात पानपानभर जाहिरात आणि टिव्हीवर पाच पाच मिनिटांना चालणार्‍या जाहिरातींसाठी येणारा पैसा आकाशातुन पडला की जमिनीतुन उगवला? हा प्रश्न आपल्या नेत्यांना जाऊन विचारा. मागे सुप्रिम कोर्टाने राजकीय प़क्षांच्या आर्थिक व्यवहारांना आरटीआय लावायची गोष्ट काढली तेव्हा एरवी एकमेकांचे गळे धरणारे हे काँग्रेस आणि बीजेपीवाले कसे एक झाले आणि त्यांनी या पारदर्शिततेला कसा आणि का विरोध केला याचाही पडताळा घ्या. जनता इतकी हुषार की त्यांना येडियुरप्पासारख्या निवडून आलेल्या भ्रष्टाचार्‍यांमध्ये भारताचं भविष्य दिसतं, काय बोलणार आता!!

0 comments:

Post a Comment

 

Neo-paradoxes Design by Insight © 2009