Monday 20 October 2014

सगळ्या विषयात होणारा वाद हा काँग्रेस विरुद्ध बीजेपी हाच अनुषंगाने नेण्याची राजकीय पक्षाची भुमिका आणि तो तसा स्विकारण्याचा जनतेचा कल हे आपल्याला निदान आतातरी साधे वाटत असले तरी ते भविष्यात भयंकर स्वरुप धारण करेल. निव्वळ चिकित्सा करणारी व्यक्ती एकतर विरोधक किंवा समर्थक यापेक्षा वेगळी असूच शकत नाही ही भुमिका चांगली सक्षम होताना दिसते आहे. सगळ्या गोष्टीं ह्या लिनिअर बायनरी भुमिकेतुनच पडताळण्याचा सोशल नोर्म बनतो आहे का? ह्या सगळया गोष्टी पक्षीय नजरेतुन आणि त्यांना होणार्‍या राजकीय फायद्याच्या अनुषंगानेच नसून त्याला इतरही कोपरे/पदर आहेत. राजकारण म्हणाजेच समाजकारण नव्हे, ही भुमिका ठसवण्याची आताच खूप गरज आहे. कारण ज्या प्रकारचा प्रोपोगंडा या निवडणुकीत चालवला गेला आणि तो चांगल्यापैकी भान आणि समज असणार्‍या लोकांनीही न तपासता बिनदिक्कतपणे सर्वत्र प्रसारीत केला ही चिंतेची बाब आहे. थोडक्यात आपण समाज म्हणून, पुर्णपणे शरणागती पत्करलेल्या एका नव्या आधुनिक बांधणीच्या, नियंत्रित हायार्कीअल संस्थेमध्ये रुपांतरीत होतोय का ते आताच तपासून त्याला काउन्टर करायची तयारी ठेवली पाहीजे. मला ही स्लेव्हस ची भुमिका भयंकर चिंतेत पाडणारी वाटते. लिबर्टी हिसकावून घेणार्‍यापेक्षा, त्याला ती स्वतःहून दान करण्याची मानसिकता नक्कीच अनुत्तरीत करणारी आहे. बाकी सध्याच्या चाललेल्या आरोप प्रत्यारुपांच्या रण्धुमाळीत पुन्हा ऑरवेलचेच एक वाक्य आठवते. 'In future,(dystopian) there will no loyalty except loyalty to the party!!!' तर,आपण याच दिशेने प्रवास करतोय का?

0 comments:

Post a Comment

 

Neo-paradoxes Design by Insight © 2009