Monday 20 October 2014

मला पंपंची भाषण शैलीही कधीच आवडली नाही. विचित्र अनुनासिक उच्चार, वाक्य संपवताना उगाचच हेल काढून ओरडल्यासारखं करणं....मध्येच आवाज बारीक करुन खालच्या सुरात बोलल्यासारखं करणं म्हणजे, तर चाळीतल्या बाया दुपारी कामं आटपल्यावर व्हराड्यांत कुजबुजत जे गॉसिपिंग करतात तेथुन उचलल्यासारखं वाटतं.
बाकी भाषणाचा कंटेट हा पुर्ण ९० च्या दशकातला बी-ग्रेडी फिल्मी वाटतो. मै देश का नाम रोशन करुंगा, देश को झुकनें नही दुंगा, देश का नाम दुनिया मे बडा करुंगा ...इ. मिथुन चक्रवर्ती-गोविंदा छाप आदर्श वाक्यांतून लोकांना नेमकं काय मिळतं आणि काय आवडतं ते समजत नाही. बाकी मोदींच्या भाषणात माहितीच्या नावाने बोंब. कसलाच अभ्यास नाही. इतिहास भुगोलाच्या आणि स्टॅटिस्टिक्सच्या अक्षम्य चुका!! तेही इतके सारे लोक लाईव्ह बघत असताना. आपल्या पक्षाच्या संस्थापकांचाच इतिहास चुकवला?? मोहनदास नव्हे तर मोहनलाल गांधी!! एक दोन चुका होणं ग्राह्य धरताही येईल पण, यांनी इतके ब्लूपर्स करुन ठेवलेत की त्यावर एक स्तंभलेख किंवा अर्ध्या तासाचा कॉमेडी शो होईल!! शुद्ध हिंदी उच्चारांचं सोडून द्या, बाकीचंच जमत नाही तर हे खूपच दूरवरचं झालं. एवढं सगळं करुन खोटं बोलणार तेसुद्धा रेटून आणि बिनधास्त!
वाजपेयी, बाळासाहेब आणि राजची भाषण ऐकल्यावर त्यांचे काही मुद्दे पटतात तर बरेच पटत नाहीत. भाषणात चुका त्यांनीही केल्या असतील पण त्यांची भाषणं ऐकावीशी वाटतात, मुलाखती पहाव्याशा वाटतात. पण मोदींची भाषणं मला तरी बघवत नाहीत. बाकी फक्त एकच व्यक्ती अशी आहे की जी मोदींपेक्षा भयंकर इरीटेट करते, ती म्हणजे देवेंद फडणवीस!!

0 comments:

Post a Comment

 

Neo-paradoxes Design by Insight © 2009